"अक्षता" विचार करा व पटल्यास योग्य कृती करा
आपल्याकडे मंगलकार्यासाठी तांदूळ या जीवनाय्श्यक अन्नघटकाचे खूपच महत्व आहे. चौरंगावर देवतेची प्रतिष्ठापणा करण्यासाठी, नव्या नवरीने माप ओला ओलंडण्यासाठी व वधू-वरांना मंगलाक्षतांचे औक्षण करण्यासाठी आशीर्वादस्वरूप आपण अक्षता म्हणून तांदूळ वापरतो. या सर्वांसाठी साधारणत: ३ ते ५ किलो तांदूळ लागतो. हा तांदूळ कार्य झाल्यावर अक्षरश: वाया जातो. आज तांदुळाची किंमत साधारण ३० ते ३५-४० रु. किलो एवढी आहे.
आज एकटया मुंबई शहरात ७ ते ८ हजार मंगल कार्यालये आहेत म्हणजे तेवढी मंगलकार्य एकटया मुंबई शहरात एका दिवशी होतात. सबंध वर्षात मुहूर्ताचे ६० दिवस धरले तर हा हिशेब पुढीलप्रमाणे होईल. ७ हजार कार्यालये x ६० दिवस x प्रत्येकी ३ किलो तांदूळ = १२ लाख ६० हजार किलो तांदूळ आपण वाया घालवतो. सबंध महाराष्ट्र राज्याचा व पुढे देशाचा विचार केला तर हे गणित काय होईल याचा विचार केला तर हे गणित काय होईल याचा विचार करा. सामाजिक बांधीलकी म्हणून हा तांदूळ आपण वाचवू शकलो तर कीत्येक गोरगरीब कुटुंबाना - ज्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांना - तो मिळू शकतो. कार्याच्या आदल्या दिवशी ३ किलो तांदूळ स्वहस्ते एखाद्या गरीब व्यक्तीला दया पुण्य मिळेल. निदान पुण्यकृत्य केल्याचे समाधान मिळेल. अक्षता तर वधू - वरांच्या डोक्यावर पडतच नाहीत हे सर्वांनाच माहित आहे. या साठी पुढील उपाय करता येईल. विवाहनंतर वधू-वर स्वागत सभारंभासाठी स्टेजवर बसतात. तिथे एका तबकामध्ये १ किलो भर तांदूळ ठेवा. भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तांदुळाचे ४-४ दाणे जरी वधू - वरांच्या डोक्यावर टाकले तरी ते प्रत्यक्ष त्यांच्या डोक्यावर पडतील. आपल्याला समाधान मिळेल व दोन किलो तांदूळ वाचतील.
मंगलकार्यात व सत्यनारायण इ. पूजांच्या प्रसंगी चौरंगावर देवतेची प्रतिष्ठापना करण्यासाठी तांदुळाऐवजी फुलांच्या पाकळ्या तसेच वधूचा ग्रहप्रवेश तिने तांदुळाचे माप न ओलांडता, तिच्या मस्तकावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून करावा. तांदूळ तर वाचलेच, पण त्या नववधूला किती आनंद होईल याची कल्पना करा.
हे जर आपण कृतीत आणले तर कळत नकळत एका महान देशकार्यात आपला सहभाग होईल.
Page 12 of 13